भाजप मंत्र्याने शत्रुघ्न सिन्हांना केले ‘खामोश’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shatrughan sinha

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी विरोधकांच्या रॅलीत सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी सिन्हा यांच्यावर टीका केली असून सिन्हा यांना त्यांच्याच अंदाजात उत्तर दिले आहे. ‘शत्रुघ्न सिन्हा हे खामोश राहिले तरच चांगले आहे’ असे वक्तव्य सुप्रियो यांनी केले आहे.

सुप्रियो यांनी ट्विटरवरून शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर टीका केली आहे. ‘शत्रुघ्न सिन्हा बोलतात, की मी जे बोलतो, करतो ते सर्व देशातील जनतेच्या हितासाठी असते. कुणी यांना विचारा जरा की यांनी देशाच्या हितासाठी आतापर्यंत केले तरी काय आहे. त्यामुळे ते खामोश राहिले तरच खूप बरे होईल’, असे ट्विट बाबुल सुप्रियो यांनी केले आहे.

शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या विरोधकांच्या रॅलीस सिन्हा यांनी मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या विरोधकांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना टीकेचे लक्ष्य केले. “जोपर्यंत तुम्ही खरी उत्तरं दडवून ठेवण्याचा प्रयत्न कराल तोपर्यंत तुम्हाला जनतेकडून ‘चौकीदार चोर है’ ऐकावेच लागेल” असं म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.