मार खाने की याद आई क्या! शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या बँक व्यवस्थापकाला बच्चू कडूंचा सवाल

1702

शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या बँक अधिकाऱ्याला आमदार बच्चू कडू यांनी आज फैलावर घेतली. या शेतकऱ्याला मिळालेल्या पीक विम्याच्या अनुदानातून या बँकेने काही रक्कम कापून घेतली होती. हे प्रकरण शेतकऱ्याने बच्चू कडू यांच्या कानावर घालताच ते अचलपूर मतदारसंघातील करजगाव मधल्या सेंट्रल बँकेत धडकले. या अधिकाऱ्याच्या समोर ठाण मांडून बसत बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला झाप झाप झापला.

एकीकडे सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे जे पैसे शेतकऱ्याला अनुदान स्वरुपात मिळाले आहेत त्यातून बँकेने अशा पद्धतीने रक्कम कापून घेणं चुकीचं आहे असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. बच्चू कडू यांनी हे प्रकरण गंभीर असल्याने बँक अधिकाऱ्याला गाठले आणि त्याला मार खाने की याद आई क्या! अशा शब्दात जाब विचारला. बच्चू कडू हे यापूर्वी काही अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी वादात सापडले आहेत. मंत्रालयामध्ये देखील त्यांनी एका अधिकाऱ्याला मारले होते असा आरोप करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या