चंद्रावर पहिले पाऊल ‘बाहुबली’ने ठेवले; विद्यार्थ्याच्या लॉजिकचे कौतुक करत शिक्षकाने दिले दुप्पट गुण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परीक्षेच्या पेपरात काहीच सुचत नसल्यामुळे उत्तरपत्रिकेत बॉलीवूडची गाणी लिहून येणारे अनेक महाभाग आहेत. अशातच एका चिमुकल्याने परीक्षेत लिहिलेले उत्तर सध्या चर्चेत आले असून ही उत्तरपत्रिका सध्या व्हायरल होतेय. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण, या प्रश्नाचे उत्तर म्हणून विद्यार्थ्याने चक्क ‘बाहुबली’ या चित्रपटाचे नाव लिहिले आहे. विशेष म्हणजे शिक्षकानेही त्याच्या लॉजिकचे कौतुक करत पाचपैकी चक्क दहा गुण दिले आहेत. आता चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग आहे. मग शिक्षकाने बाहुबली या उत्तराला पूर्ण गुण का दिलेत, असा प्रश्न सहाजिकच तुम्हाला पडला असेल. उत्तर ऐकल्यावर त्या मुलाच्या बुद्धिमत्तेचे तुम्हीदेखील कौतुक कराल. उत्तरात बाहुबली असे लिहिल्यानंतर त्याने खाली या शब्दाची फोड करत बाहू (arm) बली (strong) असे लिहिले आहे. त्याच्या या अफाट बुद्धिमत्तेचे नेटिझन्सनेदेखील कौतुक करत आहेत.