
माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणातील दोघा आरोपींना मोक्का न्यायलयाने आज दणका दिला. आरोपींनी जामिनासाठी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी त्यांच्या वांद्रे पूर्वेकडील कार्यालयाबाहेर गॅंगस्टर अनमोल बिष्णोई गँगच्या गुंडानी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने तपास करत 26 आरोपींना अटक केली. अटक व पाहिजे आरोपींविरोधात पोलिसांनी दोषारोप पत्रदेखील दाखल केले होते. शिवाय या सर्वाधिक ओघात मोक्काचे कलमदेखील लावण्यात आले. दरम्यान, अटकेत असलेले सलमान वोहरा आणि प्रदीप ठोंबरे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.