काँग्रेस कार्यालयाबाहेर लिहिले ‘हज हाऊस’, बजरंग दलावर तोडफोड केल्याचाही आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून कार्यालयाचे नुकसान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच कार्यालयाच्या भिंतींवर या हज हाऊस असे लिहण्यात आले आहे.

गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी नुकतेच एका सभेला संबोधित करताना म्हणाले होते की, देशाच्या तिजोरीवर पहिला हक्क हा अल्पसंख्यांकांचा असायला हवा. हेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देखील म्हटले आहे”

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने ठोसर यांच्या या वक्तव्याचा विरोध केला आहे. त्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेश कमिटीच्या कार्यालयावर हज हाऊस लिहले आहे. तसेच त्यांनी कार्यालयाच्या भिंतीवर हे आता हजचे कार्यालय असल्याचे पोस्टर व होर्डिंगही लावले होते. मात्र पोलिसांनी ते तत्काळ हटवले.