
शिव विद्या प्रबोधिनीच्या ‘बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस, आयएफएस, आयपीएस, आयआरएस अभ्यासक्रमाचे राज्यातील एक हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी रविवारी 24 जुलैला राज्यस्तरीय ऑनलाइन प्रवेश परीक्षा होणार असून 1 ऑगस्टपासून ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत.
सनदी सेवेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने शिवसेनेच्या वतीने गेल्या 21 वर्षांपासून ‘बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमी’ हा उपक्रम राबवीत आहे. प्रशिक्षणासाठी इच्छुक पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी अॅकॅडमीशी संर्क साधावा तसेच प्रशिक्षणाबाबत www.svplas.com या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे, असे अॅकॅडमीचे संस्थापक, संचालक शिवसेना उपनेते विजय कदम यांनी सांगितले.
असे असेल वेळापत्रक
– राज्यस्तरीय ऑनलाइन प्रवेश परीक्षा – 24 जुलै,
– वेळ ः सकाळी 11 ते दुपारी 1.
– प्रवेश परीक्षा निकाल – 27 जुलै
– ऑनलाइन प्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया – 27 ते 31 जुलै
– ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग – 1 ऑगस्ट,
वेळ – सकाळी 11.ते दुपारी 1
– संपर्क – बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमी, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी, मुंबई – 25
– संपर्क क्रमांक –
022-24221166,
24371177
– वेळ ः सकाळी 11 ते
सायंकाळी 6

































































