Photo – शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्यानुसार ठिकठिकाणी रक्तदान शिबीर, अवयवदान शिबिरांबरोबरच रुग्णांना फळवाटप, ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिक कार्ड, ब्लँकेट वाटप करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वापट, कोरोना योद्धय़ांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धाही पार पडल्या.

balasaheb-jayanti-1

भारतीय कामगार सेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुंबई विमानतळाजवळ अभिवादन करण्यात आले. शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, विभागप्रमुख, परिवहनमंत्री, अॅड. अनिल परब, युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, सदा परब, विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संजय कदम, संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे आदी उपस्थित होते.

balasaheb-jayanti-3

शिव वाहतूक सेना आणि युवासेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंधेरी येथे मुंबई वाहतूक पोलिसांना हेल्मेट वाटण्यात आले. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शकुंतला मेस्त्री, नीलेश भोसले, मनोहर पांचाळ, सुभाष सावंत, विनय मोरे, युवासेना विभाग अधिकारी मयूर पांचाळ, मनोज जांगिड आदी मान्यवर उपस्थित होते.

balasaheb-jayanti-4

विभागप्रमुख सुधाकर सुर्वे व महिला विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्रमांक 28चे नगरसेवक एकनाथ हुंडारे यांनी स्थानिकांना स्टिमर मशीन वाटप करण्यात आले आहे. यावेळी सुवर्णा कोठावळे, किशोर कांबळे, नंदिनी मसुरकर, शाखा समन्वयक अजित गायकवाड, कार्यालय प्रमुख विनायक धोत्रे, धीरज राजगुरव, धनाजी ठापूर, सतीश नाईक, मनोहर पाटील आदी उपस्थित होते.

balasaheb-jayanti-2

शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संघटक व नगरसेवक दिलीप शिंदे यांच्या प्रयत्नाने गोरेगाव पश्चिम विधानसभा क्षेत्रामधील अपंग व विकलांग नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी उपशाखाप्रमुख रेमंड डिसूझा, संतोष वालगुडे, अमर मेहंदळे, चंद्रकांत मोरे, जितेंद्र इंगळे, अनिल यादव, मुन्ना सिंग, महेंद्रा इंगवे हजर होते.