
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक उपविभागप्रमुख राजू पेडणेकर, माजी नगरसेविका, महिला विभाग संघटक राजुल पटेल यांच्या वतीने व विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन महोत्सव 18 जानेवारी ते 5 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
जोगेश्वरी पश्चिम येथील म्हाडा मैदान, ओशिवरा पार्कसमोर गणेश नगर येथे हा महोत्सव होणार आहे. 20 जानेवारी रोजी माता की चौकी, 21 जानेवारी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम, 22 जानेवारी रोजी बाल महोत्सव, जादूचे प्रयोग, 24 जानेवारी रोजी कव्वालीचा कार्यक्रम, 26 जानेवारीला महाराष्ट्राची लावणी, 27 जानेवारी रोजी हळदीकुंकू समारंभ आणि 28 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा, सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत उत्तर हिंदुस्थानींचा मेळावा, भोजपुरी संगीताचा कार्यक्रम होणार आहे.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखाप्रमुख दयानंद सावंत, गोविंद वाघमारे, महिला शाखा संघटक सुनीता सरोज, कल्पना कोकणे, युवासेना विभाग अधिकारी मोहित पेडणेकर, युवती अधिकारी भाग्यश्री आभाळे, कार्यालय प्रमुख ज्ञानेश्वर जाधव, संतोष धनावडे परिश्रम घेत आहेत.


























































