
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होईल असे मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र विकास आघाडीतील खातेवाटपाची चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असून येत्या दोन दिवसांत त्याबाबतचा निर्णय होईल असे ते म्हणाले.
सत्ता गेल्याने अस्वस्थता
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने या नेत्यांना विधानसभेची उमेदवारी दिली, मात्र अनेकांना पराभव पत्करावा लागला. भाजपची सत्ता गेल्याने हे नेते सध्या अस्वस्थ असल्याचेही थोरात म्हणाले.





























































