
बालेवाडीत हाय स्ट्रीट हॉटेल हॅपी द हार्ट येथे सिलेंडरचा स्फोट झाल्याने चार कामगार भाजले आहेत. अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर चतु:श्रुगी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, हॉटेलमध्ये स्फोट झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.































































