‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, मकरसंक्रांत विशेष भाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कलर्स मराठीवर येत्या रविवारी ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेचा विशेषभाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेमध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो… मग दिवाळी असो वा दसरा असो…. यावेळेस मालिकेमध्ये मकरसंक्रांत पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाणार आहे… हा विशेष भाग येत्या रविवारी म्हणजेच 13 जानेवारीच्या ‘महा रविवार’मध्ये दुपारी 12 आणि सायंकाळी 7 वाजल्यापासून दाखवला जाणार आहे.