
मुंबईत वांद्रे येथील कलानगर पूल आणि सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR Extension) मागील तीन महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वरुण सरदेसाई यांनी मे महिन्यामध्ये कलानगर पूल आणि SCLR Extension चे लोकार्पण करण्याची विनंती MMRDA आयुक्तांना केली होती. परंतु, त्याचे उद्घाटन झाले नाही आणि पावसाळ्यात लोकांना मोठ्या वाहतुककोंडीला सामोरे जावे लागले. आता तीन महिन्यांनी शासनाला मुहूर्त सापडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कलानगर पूल, SCLR Extension, मंडाळे येथील मेट्रो प्रशिक्षण संस्थेची नूतन इमारत आणि मालवणी येथील कर्मचारी निवासस्थानाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. पण यासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांचे नाव टाकण्यात आलेले नाही.
वरुण सरदेसाई यांनी ट्वीटरवर (X) पोस्ट करत MMRDA आयुक्तांवर निशाणा साधला आहे. स्थानिक आमदाराचे नाव निमंत्रण पत्रिकेवर न टाकणे हे राज्य शिष्टाचाराच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटले आहे. “उद्या मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या मतदारसंघातील कलानगर पूल आणि SCLR Extension चे उदघाटन होणार आहे. दोन्ही पूल तब्बल 3 महिन्यांपासून पूर्ण तयार असून केवळ उदघाटन झाले नाही म्हणून लोकांना वापरता येत नव्हते. पावसाळ्यात लोकांना मोठ्या वाहुतुककोंडीला सामोरे जावे लागले. मी MMRDAआयुक्तांना भेटून मे महिन्यामध्ये लोकार्पण करण्याची विनंती केली होती. माझ्या मतदारसंघातील प्रोजेक्ट असून केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून स्थानिक आमदाराचे नाव निमंत्रण पत्रिकेवर न टाकणे हे राज्य शिष्टाचाराच्या विरोधात आहे हे MMRDA आयुक्तांनी लक्षात घ्यावे.” असे वरुण सरदेसाई म्हणाले आहेत.
उद्या मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या मतदारसंघातील कलानगर पूल आणि SCLR Extension चे उदघाटन होणार आहे.
दोन्ही पूल तब्बल ३ महिन्यापासून पूर्ण तयार असून केवळ उदघाटन झाले नाही म्हणून लोकांना वापरता येत नव्हते. पावसाळ्यात लोकांना मोठ्या वाहुतुककोंडीला सामोरे जावे लागले.
मी… pic.twitter.com/Ss74T2axoQ— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 13, 2025