
जमिनीत खड्डा खोदणाऱया बेडकांच्या नव्या प्रजातीचे नाव ’बंगळुरू बेडूक’ असे ठेवण्यात आले आहे. 2018 साली या बेडकाचा प्रजातीचा शोध लागला होता. पहिल्यांदाच एखाद्या शहराचे नाव बेडकांना देण्यात आले आहे.
बेडकाच्या नव्या प्रजातीचे नामकरण ’स्फेरोथिका बंगळुरू’ असे करण्यात आले आहे. बंगळुरू येथील राजनकुंटे परिसरातील ओसाड जागेवर ही प्रजाती आढळली. माऊंट कार्मल काॅलेजचे प्राध्यापक दीपक पी. यांनी या बेडकांचे फोटो ज्युलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये पाठवले आहेत. बेडकांवरील संशोधन रिसर्च इंटरनॅशनल जर्नल ‘झूटॉक्स’मध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधकांच्या मते, बेडकांची नवी प्रजाती जंगलाच्या बाहेरही सापडेल. विशेषतŠ शहरांमध्ये त्यांची संख्या जास्त असेल.



























































