
बंगळुरूच्या एका मॅकेनिकल इंजिनीअरने अनोखे हेल्मेट तयार केले आहे. हे हेल्मेट उकाडय़ातही तुमचे डोके थंड ठेवणार आहे. याचं कारण म्हणजे या हेल्मेटमध्ये चक्क एसीची सुविधा मिळणार आहे. संदीप दहिया याने या हेल्मेटची निर्मिती केली असून त्यासाठी त्याला साडेचार वर्षे लागली आहेत. बाईकच्या बॅटरी सप्लायमधून होणाऱया डीसी पॉवरच्या मदतीने हे हेल्मेट काम करते. याची किंमत 40 हजार रुपये आहे.




















































