बांगलादेश विमान दुर्घटना; मृतांचा आकडा 27 वर

ढाका येथे हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान एका शाळेवर कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 27 वर गेला आहे. तर 170 हून अधिक लोक जखमी झाले. मृतांमध्ये 25 मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत.