
बनावट दस्तावेज बनवून घरकाम करणाऱ्या बांगलादेशी महिलेला डोंगरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रुबिना नाजीमुद्दीन शेख असे तिचे नाव आहे. दक्षिण मुंबईच्या वाडीबंदर येथे काही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती डोंगरी पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर शनिवारी डोंगरी पोलिसांच्या विशेष पथकाने रुबिनाला ताब्यात घेतले. रुबिना ही दारूखाना परिसरात राहत असून ती घरकाम करते. ती काही वर्षांपूर्वी हिंदुस्थानात आली. कोलकाता येथे आल्यावर तिने एका एजंटच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे तयार केली.