
35 वर्षांपासून हिंदुस्थानात अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला साकीनाका पोलिसांनी अटक केली. बादशाह मुल्ला असे त्याचे नाव आहे. त्याने काही बनावट दस्तावेज बनवल्याचे तपासात समोर आले आहे.
शहरात अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. साकीनाका येथे काही बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती साकीनाका पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी यादव नगर येथून बादशाहला उचलले. त्याच्याकडे पोलिसांना एक आधारकार्ड मिळून आले. कसून चौकशी केल्यावर तो बांग्लादेशी नागरिक असल्याचे उघड झाले. बादशाह हा भाईंदर येथील उत्तन रोड परिसरात राहत होता. 35 वर्षांपूर्वी तो हिंदुस्थानात आला होता. त्यानंतर तो त्याची ओळख लपवून राहत होता. बादशाहविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.
Bangladeshi National Arrested in Mumbai After Staying Illegally for 35 Years | Sakinaka Police
Mumbai’s Sakinaka police arrested a Bangladeshi national, Badshah Mulla, who had been living illegally in India for 35 years using fake documents. Get details on the police crackdown and the investigation here.




























































