घुसखोर बांगलादेशी तरुणीला अटक

फाईल फोटो

घुसखोरी करून राहत असल्याने बांगलादेशी तरुणीला पकडून भायखळा महिला कारागृहात ठेवण्यात आले होते; पण जेजे इस्पितळात उपचारासाठी नेले असता ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सटकली. ती मैत्रिणीचे घर गाठून लपली, पण जेजे मार्ग पोलिसांनी अचूक माग काढत पकडले.

नवी मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारी रूबीना शेख (21) या तरुणीला पासपोर्ट अॅक्ट व फॉरेन अॅक्टनुसार वाशी पोलिसांनी अटक करून तिला भायखळा कारागृहात ठेवण्यात आले होते. 14 ऑगस्ट रोजी तिला जेजे इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र रुबिनाने संधी साधत पैदी पार्टीतील महिला अंमलदाराच्या हातावर झटका देऊन पळ काढला होता. त्यामुळे याप्रकरणी जेजे मार्ग पोलीस ठाण्यात रुबिनाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. वरिष्ठ निरीक्षक रईस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत नेरकर व पथकाने रुबिनाला पकडले.