
नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त तुम्ही बाहेर फिरण्याचा बेत आखला असेल किंवा रोखीचा व्यवहार करण्यासाठी बाहेर जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण या आठवड्यात बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांची कामे गुरुवारपर्यंत उरकून घ्या.

या आठवड्यात बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. शुक्रवारी नाताळच्या निमित्ताने बँका बंद राहणार आहेत. तसेच प्रत्येक महिन्यात बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतात. यंदा चौथा शनिवार नाताळच्या दुसऱ्या दिवशी अर्थात 26 डिसेंबरला आला आहे. त्यानंतर रविवार अर्थात आठवड्याची सुट्टी असणार आहे.

तसेच पुढील आठवड्यात वर्षातील अखेरचा दिवस येणार आहे. त्यानंतर 1 जानेवारीपासून बँकांच्या अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे बँकांची कामे वेळेत पूर्ण करून घेणेय योग्य, अन्यथा तुमच्या खिशाला याचा भूर्दंड बसू शकतो.

सरकारने 31 डिसेंबरपर्यंत आय कर भरण्याची तारीख दिली आहे. आयकर भरण्यासाठी तुम्हाला बँकेच्या कागदपत्रांची आवश्यकता भासल्यास सुट्ट्यांमुळे ते शक्य होणार नाही. त्यामुळे गुरुवारपर्यंत हे काम देखील उरकून घ्या.






























































