रवींद्र मराठेंना रुग्णालयात दाखल केले, बुधवारी झाली होती अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

बँक ऑफ महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र मराठे यांना गुरुवारी सकाळी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखायला लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं सांगण्यात येत आहे. मराठे यांना पुणे पोलिसांनी बुधवारी अटक केली होती.

रिझर्व्ह बँकेच्या नियमांना पायदळी तुडवत बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ‘ड्रीम सिटी’ या प्रकल्पासाठी अस्तित्वात नसलेली ‘आभासी संपत्ती’ तारण ठेवून बेकायदेशीरपणे ८० कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याने बँक ऑफ महाराष्ट्रचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र मराठे यांना अटक करण्यात आलेली आहे.

डीएसके घोटाळय़ात बँक अधिकाऱ्यांचा बळी