घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठानचे विनामूल्य बास्केटबॉल शिबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सामाजिक व क्रीडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही विनामूल्य बास्केटबॉल शिबिराचे आयोजन केले आहे. नवोदित खेळाडूंसाठी 15 ते 24 एप्रिल या कालावधीत प्रशिक्षण शिबीर रंगणार असून 25 एप्रिल ते 5 मे या कालावधीत ऍडव्हान्स प्रशिक्षण शिबिरात खेळाडूंना खेळातील बारकावे आत्मसात करता येतील. हे विनामूल्य शिबीर जिल्हा प्रशिक्षण केंद्र, घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठान, आचार्य अत्रे मैदान, पंतनगर येथे आयोजित करण्यात येणार आहे. क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा अधिकारी बाजीराव कळंत्रे, कुर्ला तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, क्रीडा मार्गदर्शक वासुदेव थिटे यांचे मार्गदर्शन या शिबिरात युवकांना मिळणार आहे. मुख्य प्रशिक्षक सचिन मठपती, अध्यक्ष अजय बागल, सचिव सुजित झेंडे यांच्या पुढाकाराने दरवर्षी या शिबिराचे सातत्याने यशस्वी आयोजन केले जात आहे. संपर्क 9004296609.