शास्त्री, विराटवर ‘बीसीसीआय’ नाराज; कारवाई होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत तब्बल 50 वर्षांनंतर विजय मिळवून विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ने ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र तरीही बीसीसीआय विराट कोहली आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचे समोर आले.

चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले. रवी शास्त्री आणि विराट कोहली या दोघांनी गेल्या आठवडय़ात लंडनमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतला होता. रवी शास्त्रींना या कारणामुळेच कोरोना झाल्याची चर्चा असल्याने शास्त्रींसह कर्णधार विराट कोहलीवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या सूत्राने याबाबत माहिती दिली आहे. शास्त्रींच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी विराट कोहलीही उपस्थित राहिला होता. रवी शास्त्री पॉझिटिव्ह आल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनाही कोरोनाची लागण झाली. हे सर्व आता क्वारंटाइन आहेत.