बीसीसीआय-पेटीएममध्ये 326.80 कोटींची डील

469

पेटीएमचे मालकी हक्क असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बीसीसीआयचे टायटल स्पॉन्सर्सशिपचे हक्क आपल्याकडे कायम राखले आहेत. याअंतर्गत आंतरराष्ट्रीय व स्थानिक स्पर्धांमधील एका सामन्यासाठी पेटीएमला 3.80 कोटी मोजावे लागणार आहेत. हिंदुस्थानात 2019 ते 2023 सालापर्यंत होणाऱया सर्व सामन्यांसाठी हा करार करण्यात आला आहे. ही रक्कम 326.80 कोटींची असणार आहे. याआधी प्रत्येक सामन्याला 2.4 कोटी पेटीएमकडून देण्यात येत होते, मात्र आता या रकमेत 58 टक्के वाढ करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या