टी-20 विश्वचषकातील मानहानीकारक पराभव जिव्हारी, बीसीसीआयकडून निवड समितीच बरखास्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा  मानहानीकारक पराभव झाला.  या पराभवानंतर आता बीसीसीआने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने थेट निवड समितीच्या नियुक्तीसाठी नवीन जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमध्ये निवड समिती सदस्यांसाठी काय नियम असतील आणि कोण पात्र ठरतील, हेदेखील स्पष्ट केले आहे.ऑस्ट्रेलियातील दारुण पराभवासाठी हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीलाच  जबाबदार धरले आहे. त्यासाठी बोर्डाने पूर्ण निवड समितीच बरखास्त करण्याचा धक्कादायक निर्णय आज घेतला आहे.

बीसीसीआय विश्वचषकातील पराभवानंतर मोठा निर्णय घेईल असे संकेत होते, मात्र हा निर्णय कर्णधार पिंवा प्रशिक्षक यांच्याबाबत घेतला जाईल असे मानले जात होते.  पण आता बीसीसीआयने संपूर्ण निवड समितीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विश्वचषकात ज्या निवड समितीने संघ निवडला होता त्या सदस्यांचीच हकालपट्टी करण्यात आली आहे. आता बीसीसीआय नवी निवड समिती स्थापन करणार आहे. त्यासाठी आता बीसीसीआयने खास जाहिरातही दिली आहे. या जाहिरातीमध्ये आता कोणते खेळाडू पात्र ठरू शकतात, याची यादीही त्यांनी दिली आहे.

n चेतन  शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या कार्यकाळात टीम इंडियाने 2021 च्या
टी- 20 विश्वचषक स्पर्धेत आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करला होता. 2021 च्या विश्वचषकात तर हिंदुस्थान बाद फेरीलाही पात्र ठरू शकला नव्हता.

बीसीसीआयच्या निवड समितीसाठी पात्रता निकष असे असतील

किमान किती सामने खेळलेले खेळाडू हवेत…

7 कसोटी सामने किंवा अधिक

30 प्रथम श्रेणी सामने किंवा अधिक

10 एकदिवसीय आणि 20 प्रथम श्रेणी सामने

‘कोणत्याही क्रिकेट समितीत  (बीसीसीआयच्या नियम आणि नियमांमध्ये परिभाषित केल्यानुसार) एकूण पाच वर्षे सदस्य राहिलेली कोणतीही व्यक्ती पुरुष निवड समितीचा सदस्य होण्यास पात्र नाही.’

बीसीसीआय

अशी होती जुनी निवड समिती

चेतन शर्मा (उत्तर विभाग), हरविंदर सिंह (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबाशिष मोहंती (पूर्व विभाग). यातील काही सदस्यांची नियुक्ती 2020 मध्ये तर काही सदस्यांची नियुक्ती 2021 मध्ये झाली होती.