सतत येणाऱ्या घामापासून सुटका मिळवण्यासाठी सौंदर्यवतीची धडपड अंगाशी आली, शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू

शरीराला घाम येणे ही नैसर्गिक बाब आहे. तरीही अतिघाम येणे काही वेळा अतिशय त्रासदायक ठरते. याचा तिटकारा एका सौंदर्यवतीला आला आणि तिने घामापासून स्वत:ची कायमचीच सुटका करून घ्यायचे ठरवले, पण ही धडपड तिच्या अंगाशी आली.

मेक्सिको येथील ओडालिस सॅन्टोस मेना (23) सौंदर्यवतीने अंगाला सतत येणाऱ्या घामापासून कायमची सुटका होण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. यासाठी ती साउथमधील बॅकस्ट्रिट क्लिनिकमध्ये दाखल झाली होती. शस्त्रक्रियेवेळी डॉक्टरांनी भूल दिल्यानंतर तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. ओडालिसचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी वैद्यकीयदृष्ट्या अनेक प्रकारे प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आले नाही.

मृत्यूनंतर मिळालेल्या शवविच्छेदन अहवालात असे म्हटले आहे की, तिचा मृत्यू भूल देताना दिलेली औषधे आणि स्टिरॉइड यांच्या संयोगामुळे झाला आहे तसेच तिच्यावर औषधोपचार करणारे भूलतज्ज्ञ प्रशिक्षित नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. तिच्या मृत्यूच्या प्राथमिक अहवालात भूलतज्ज्ञाच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे तसेच या क्लिनिकडे त्यांचा परवानाही नाही. क्लिनिकने मेनाच्या डॉक्टरांवर असा आरोप केला आहे की, त्यांनी स्वाक्षरी दिल्यानंतर तातडीने तिच्यावर औषधोपचार करण्यास सुरुवात केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या