अखेर ‘ते’ बाळ खिटे कुटुंबियाकडे सुपूर्द

22

सामना प्रतिनिधी । बीड

हे बाळ आमचे नाही, आम्ही मुलाला जन्म दिला. ही मुलगी आहे, आमचे बाळ बदलले गेले. या बाळाचा आम्ही सांभाळ करणार नाही, असे म्हणत त्या मुलीला प्रशासनाच्या ताब्यात देणाऱ्या खिटे कुटुंबियाचा डीएनए जुळल्यानंतर शुक्रवारी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून त्या मुलीला खिटे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बीडच्या जिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या छाया खिटे यांनी आम्ही मुलाला जन्म दिला, ही मुलगी आमची नाही अशी भूमिका घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. जिल्हा रुग्णालयातील सर्व कागदपत्रावर मुलगाच असा उल्लेख होता. खिटे कुटुंबियांनी या मुलीला सांभाळण्यास नकार दिला होता. त्या मातेने बाळाला अंगावरील दूधही पाजण्यास नकार दिला होता. अखेर या मुलीची डीएनए तपासणी करण्यात आली ती मुलगीच होती आणि खिटे कुटुंबियांनी मुलीलाच जन्म दिला होता हे निष्पन्न झाल्यावर संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या त्या मुलीला शुक्रवारी पोलिसांनी खिटे कुटूंबियाकडे सुपूर्द केले.

आपली प्रतिक्रिया द्या