
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. मंगळवारी 1297 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आज दिवसभरामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1066 रूग्णांनी कोरोनावर मात केली त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला तर उपचार घेताना 13 रूग्णांचा मृत्यू झाला.
मंगळवारी 4397 जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. 3100 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर 1297 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. यात अंबाजोगाई 206, आष्टी 138, बीड 313, धारूर 52, गेवराई 84, केज 171, माजलगाव 44, परळी 85, पाटोदा 77, शिरूर 82, वडवणी 45 अशी संख्या आहे.
बीड जिल्ह्यात दिवसभरामध्ये 1066 रूग्णांनी कोरोनावर मात केली. तर 13 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची एकुण संख्या 49 हजार 675 एवढी झाली आहे. 43 हजार 38 जणांनी कोरोनावर मात केली. मृत्युचा आकडा 865 वर जावून पोहचला. बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 86.63 एवढा आहे. तर पॉझिटिव्ह रेट 13.19 एवढा आहे.



























































