बीड जिल्ह्यात 67.99 टक्के झाले मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात काल सायंकाळी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली होती. अंतिम आकडेवारी समोर यायला मंगळवारची दुपार झाली. तब्बल 67.99 टक्के एवढे मतदान बीड जिल्ह्यामध्ये झाले. बीड जिल्ह्यात परतीचा सुरू असलेला पाऊस मतदानाचा टक्का घटवतोय की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. काल सकाळच्या सत्रात मतदान धिम्या गतीने झाले होते. मात्र दुपारनंतर मतदान केंद्राबाहेर लागलेली रिघ सायंकाळी उशिरापर्यंत कायम होती. अंतिम आकडेवारी हातात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 67.99 टक्के एवढे मतदान झाले आहे.

गेवराई विधानसभा मतदारसंघात 3 लाख 52 हजार 192 एवढे मतदान आहे. पैकी 1 लाख 40 हजार 220 पुरूषांनी आणि 1 लाख 20 हजार 671 महिलांनी असे एकूण 2 लाख 60 हजार 891 एवढेच मतदान झाले आहे. त्याची सरासरी 74.08 एवढी आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघात 3 लाख 31 हजार 160 एवढे मतदान आहे. 1 लाख 23 हजार 349 पुरूषांनी, 1 लाख 4 हजार 308 महिलांनी असा एकूण 2 लाख 27 हजार 627 मतदारांनी आपला अधिकार बजावला. माजलगाव विधानसभा मतदारसंघाची मतदानाची सरासरी 68.75 एवढी आहे.

बीड विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान 3 लाख 35 हजार 150 एवढे आहे. 1 लाख 20 हजार 590 पुरूषांनी, 98 हजार 909 स्त्रियांनी असे 2 लाख 19 हजार 500 मतदारांनी मतदान केले. सरासरी 65.49 टक्के एवढेच मतदान झाले. आष्टी विधानसभा मतदार संघात 3 लाख 70 हजार 450 एवढे मतदान आहे. यात 1 लाख 30 हजार 547 पुरूषांनी, 1 लाख 8 हजार 526 स्त्रीयांनी असे 2 लाख 39 हजार 73 मतदारांनी 64.54 च्या सरासरीने मतदान केले.

केज विधानसभा मतदारसंघात 3 लाख 61 हजार 704 एवढे मतदान आहे. 1 लाख 22 हजार 716 पुरूषांनी, 1 लाख 5 हजार 258 स्त्रीयांनी असे एकुण 2 लाख 27 हजार 975 मतदारांनी आपला अधिकार बजावला. मतदानाची सरासरी 63.03 एवढी आहे. परळी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 6 हजार 204 एवाढे मतदान आहे. 1 लाख 19 हजार 541 पुरूषांनी, 1 लाख 3 हजार 749 स्त्रियांनी असे 2 लाख 23 हजार 300 मतदारांनी 72.93 च्या सरासरीने मतदान केले. एकूण 13 लाख 98 हजार 396 मतदारांनी आपला अधिकार बजावला आहे.