सतर्कता बाळगा! बीडचे जिल्हाधिकारी सेल्फ क्वारंटाईन, कॉनटॅक्ट ट्रेसिंगचे काम युद्ध पातळीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. संभाव्य कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने परळी, अंबाजोगाई, बीडमध्ये कॉनटॅक्ट ट्रेसिंगचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. आपली जबाबदारी आणि सतर्वâता बाळगत बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार स्वत:हून होम कॉरंटाईन झाले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पी.ए.शी संपर्क आला असेल तर समोर यावे आणि क्वारंटाईन व्हावे असे आवाहन केले जात आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे हे मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांची काल कोरोना चाचणी झाली. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 8 तारखेपर्यंत ते बीड जिल्ह्यामध्ये होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये अंबाजोगाईत स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात उद्घाटनाचा कार्यक्रमही झाला. त्यापूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका पण घेतल्या. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आता आरोग्य विभाग कामाला लागले आहे. मुंडेंच्या कॉनटॅक्ट ट्रेसिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परळी, अंबाजोगाई शहरामध्ये कॉनटॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयातील डॉक्टरांच्याही स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. एवढेच काय आपले सामाजिक भान समोर ठेऊन आणि जबाबदारीची जाणिव ओळखून दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. अनेक लोकप्रतिनिधी क्वारंटाईन होत आहेत. या सर्व अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या स्वॅबचे नमुने तातडीने तपासले जाणार आहेत. त्याशिवाय अजून कोणी संपर्कात आले असतील तर त्यांनीही समोर येण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.