बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशे जवळ, आज सहा जण पॉझिटिव्ह आढळले

बीड जिल्ह्यातून आज 258 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब  तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात सहा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 190 वर पोहोचला आहे, तर 68 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण शोधण्यासाठी सॅम्पलची संख्या वाढवण्यात आली आहे. एकीकडे बीड शहरात मेगा सर्वेक्षण झाले आहे तर दुसरीकडे आज रात्री 12 वाजता लॉकडाऊनची मर्यादा संपुष्टात येत आहे. बुधवारी ही 258 जणांचे सॅम्पल तपासण्यात आले यात आज सहा  रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत तर उर्वरित निगेटिव्ह आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्णाची संख्या 190 वर पोहोचली आहे.

आज पर्यंत 117 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. सध्या बीड जिल्ह्यात 68 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. जिल्ह्यात आज दोन जणांचा सॅम्पल घेतल्यानंतर मृत्यू झाला होता ते दोघेही निगेटिव्ह आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या