
बीड जिल्ह्यातून आज 57 सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 5 जणांना कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात केज तालुक्यातील चार तर बीड शहरातील 1 रुग्णाचा समावेश आहे.
“आपण लॉकडाऊनविषयी खूप बोललो, आता…”, पंतप्रधानांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांची चर्चा
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या रुग्णांत घट होत असताना आज नवे पाच रुग्ण समोर आले आहे. आज 57 सॅम्पल तपासणी साठी गेले होते त्यातील 5 जण बाधित असल्याचे समोर आले आहे. यात केज मधील कोरोना लागण होऊन मयत झालेल्या महिलेच्या संपर्कात असणारे माळेगाव येथिल चार जण आहेत तर बीड शहरातील एक जण आहे. आता या पाच जणांच्या संपर्कात कोण कोण आले याचा शोध घेण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चे काम पूर्ण करून संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारांताईन केले जाणार आहे.































































