
नऊ महिन्यांच्या बाळाला औषध का दिले नाही, म्हणून रात्री पतीने पत्नीला झापले. याच कारणावरून पत्नीने घरात गळफास घेऊन जिवन संपवले. महिलेने आत्महत्या केल्याने नऊ महिन्यांचे बाळ पोरके झाल्याची दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील रायमोह येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायमोहा येथिल शितल अमोल चव्हाण (वय 21) यांना पती अमोल यांनी रात्री झोपताना बाळास औषध का दिले नाही, म्हणून रागवले. याचा राग धरुन घरात कोणीही नसल्याने दुपारी चार वाजता फाशी घेऊन आत्महत्या केली. सासू सासरे पुणे येथे आहेत. तर पती अमोल हा शिरुर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत कामास होता. रायमोहा येथिल ग्रामीण रुग्णालयात डॉ दत्तात्रय जवरे यांनी शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पाटोदा पोलिसांत अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला असून पी एस आय धरणीधर कोळेकर हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. किरकोळ वादातून आईने आत्महत्या केल्याने नऊ महिण्याचे बाळ पोरके झाल्याने रायमोहा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
































































