मंगळवारी बीड-लातूर-धाराशिव विधानपरिषदेची रखडलेली मतमोजणी

सामना प्रतिनिधी । बीड

बीड-लातूर-धाराशीव विधानपरिषदेची रखडलेली मतमोजणी अखेर मंगळवार होणार आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता धाराशीव येथे मतमोजणील सुरूवात होणार असून दोन तासात निकाल हाती येण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज संस्थेच्या बीड लातूर धाराशीव विधानपरिषदेच्या मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला असून न्यायालयाने मतमोजणी करा असे आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने मंगळवारी सकाळी मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूण १००६ मते मोजायची असून दोन तासात निकाल स्पष्ट होतील. मंगळवारी निकाल लागत असल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची धडधड वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेले सुरेश धस विजयाचा गुलाल उधळतात की राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अशोक जगदाळे भाजपाला भारी ठरतात हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

आपली प्रतिक्रिया द्या