
गुरुवारी परळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या नियोजनासाठी बीड येथून गेलेल्या दंगल प्रतिबंधक गाडीचा परतताना सिरसाळा येथे अपघात झाला असून या गाडीचे चालक गंभीर जखमी तर इतर 10 ते 15 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना बीड येथे उपचारासाठी आणण्यात येत आहे.

परळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या सुरक्षासाठी बीड येथून दंगल प्रतिबंधक दलाचे पथक बीड कडे परतत असताना त्यांच्या पोलीस व्हॅनला सिरसाला-दिंडरूड दरम्यान अपघात झाला. यात दहा ते पंधरा पोलीस जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.





























































