Beed Rain News – पावसाचे थैमान! जिल्ह्यात आठशे रस्ते वाहून गेले, प्रशासनाच्या कामाची पोलखोल

मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळलं आहे. पावसाने सर्वच जिल्ह्यांमध्ये तुफान बॅटिंग करत प्रचंड नुकसान केलं आहे. पावसाच्या विध्वंसामुळे बीड जिल्ह्यातील तब्बल सहा ते सात लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. पावसात शंभरच्या आसपास पूल वाहून गेले आहेत, तर जवळपास आठशे गाव खेड्यातील रस्त्यांचे जाळे उद्ध्वस्त झाले आहे.

पावसाने बीड जिल्ह्यात प्रचंड धुडगूस घातला आहे. खरीप हंगाम पाण्यात गेला असून रब्बी हंगामाची आशा आता मावळली आहे. रस्ते वाहतूक कोलमडली आहे. शेकडो घरांमध्ये पाणी घुसले आहे, घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे, संसार पाण्यात वाहून गेला आहे. राहायला घर नाही पाऊल ठेवायला शेत नाही, कुठे जायला रस्ता नाही, पावसात शंभरच्या आसपास पूल वाहून गेली आहेत तर, जवळपास आठशे गाव खेड्यातील रस्त्यांचे जाळे उद्ध्वस्त झाले आहे. एकट्या बीड विधानसभा मतदार संघात 180 गावे वाहून गेली आहेत.

Ahilyanagar Rain News – पुढचे तीन दिवस धोक्याचे! जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी

बीड शहरातील एक हजार दुकाने पाण्यात

शुक्रवारी (26 सप्टेंबर 2025) रात्रभर झालेल्या पावसाने शहराचे रुपडे बदलले आहे. खासबाग, मोमिंनपुरा नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याने नुकसान केले आहे. सकाळ पासून सुरू असलेल्या संतत धारेने शहरातील धांडे नगर, जालना रोड, नगर रोड, पेठ बीड बार्शी नाका, स्टेडियम परिसर पाण्यात आहे. शहरातील एक हजार दुकानांमध्ये पार्किंगमध्ये, तळ घरामध्ये पाणी घुसले आहे.