शिवजयंतीसाठी जय्यत तयारी, सहाशे कलाकारांचा समावेश

471
shivaji-maharaj-1

गेल्या काही वर्षांपासून बीड शहरात सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्याचे स्वरूप पूर्णतः बदलून गेले आहे, अतिशय शिस्तीमध्ये आणि अधिक उत्साही वातावरणात शिवजयंती साजरी केली जाते. यंदा छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यातील शोभायात्रेत तब्बल सहाशे कलाकारांचा ताफा असणार आहे. केरळ, ओडिशा, पंजाब, प. बंगाल येथील कलावंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर्शन घडवणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव यंदा देखील आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा होणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन होणार आहे. दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शोभायात्रा निघणार आहे. वर्गणी विरहित, डीजेमुक्त शिवजयंतीमध्ये संपूर्ण शहर सहभागी होईल. यंदा केरळ, ओडिशा, प. बंगाल, पंजाब, येथील कलावंत बीडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करणार आहेत. तब्बल सहाशे कलावंत शोभायात्रेची शोभा वाढवणार आहेत. झांज पथकामध्ये सहाशे कलावंत सहभागी होणार, ढोल पथकामध्ये शंभर कलावंत सहभागी होणार आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून महिलांना हा कार्यक्रम बघण्यासाठी सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये जागा निश्चित केल्या आहेत त्या ठिकाणी महिला आणि लहान मुले असतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या