
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. 21 दिवस संपूर्ण देशभरात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे.यादरम्यान अत्यावश्यक सेवेत येणारे दुकाने सोडता उर्वरित दुकाने बंद ठेवण्याचे आदेश बीड जिल्हाधिकारी यांनी दिले होते.बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक आदेश आज काढण्यात आला आहे यामध्ये कृषी मालाची दुकाने दुपारी 11 ते 3 या वेळेत उघडे ठेवण्याचे आदेश बीड चे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अत्यावश्यक सेवेत कुठल्याही प्रकारचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्ह्यातील प्रशासन प्रयत्न करीत आहे.जिल्हा भरात शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी आणतात या भाजीपाल्यासाठी बी,बियाणे फवारणी आवश्यक असते.म्हणूण आज जिल्हाधिकारी बीड यांनी आज शुक्रवार रोजी आदेश काढत जिल्ह्यातील कृषी मालाची दुकाने दुपारी 11 ते 3 यावेळेत खुले ठेवण्याच्या सूचना काढल्या आहेत.या आदेशाचा भाजीपाला विक्रेते व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

























































