
कोरोनाच्या भितीने अनेक तळीरामांनी बीअरकडे पाठ फिरवली आहे. कोरोना काळात बीअरची विक्री तब्बल 62 टक्क्यांनी घटली आहे.
हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. गेल्या महिन्यात बीअरची विक्री 62.5 टक्क्यांनी घटली आहे. कोरोनाकाळात थंड पेय टाळा हा सल्ला बीअर पिणार्यांनी फारच मनावर घेतला होता. जानेवारीत दिवसाला 8 लाख लिटर बीअरची विक्री व्हायची, ऑक्टोबरमध्ये त्यात घट होऊन 3 लाख लिटरवर आली आहे.
महसुल विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप म्हणाले की कोरोन काळात थंड पेय पिण्याचे टाळा असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे बीअरच्या विक्रीत घट झालेली दिसत आहे.
असे असले तरी दारूच्या विक्रीत फार फरक पडला नाही. कोरोनापुर्वी काळात दिवसाला 10 लाख लिटर दारू विकली जायची. त्याचे प्रमाण 9 लाख लिटरवर आले आहे. व्हिस्की, व्होडका, रम यांची दिवसाला 6 लाख लिटर विक्री झाली आहे. कोरोनापुर्वी दिवसाला दारूच्या माध्यमातून शासनाला सरासरी 38 ते 40 कोटी रुपयांचा महसूल मिळत असे आता दिवसाला 35 कोटींचा महसूल मिळत आहे.
लिकर शॉपमध्ये बीअरची सर्वाधिक विक्री होते, परंतु गेल्या सहा महिन्यात बीअरची मागणी घटली आहे. कोरोनाच्या भितीमुळे अनेक ग्राहकांनी बीअर पिण्याचे टाळले आहे अशी महिती दारू विक्री संघाचे अध्यक्ष अरविंद मिस्किन यांनी दिली आहे.


























































