हॅकरच्या धमक्यांना प्रत्युत्तर, अभिनेत्रीने स्वतःच केले न्यूड फोटो व्हायरल

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

सोशल मीडियावरील अकाउंट हॅक होणं काही नवीन नाही. अनेक प्रसिद्ध व्यक्तींना त्याचा त्रास होतो. हॅकर अकाउंटच्या बदल्यात काय वाटेल ती मागणी करू शकतात. अशाच एका हॅकरने एका अभिनेत्रीला न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पण या धमकीला प्रत्युत्तर म्हणून एका अभिनेत्रीने स्वतःच स्वतःचे न्यूड फोटो व्हायरल केले आहेत.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, बेला थ्रोन असं या हॉलिवूड अभिनेत्रीचं नाव आहे. बेलाचं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं. शनिवारी 15 जून रोजी बेलाने ट्वीट करून तिचं अकाउंट हॅक झाल्याचं सांगितलं. हॅकरने बेलाचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. त्याने तिला पुराव्यादाखल अनेक सेलिब्रिटींचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ पाठवले. त्याने तिचेही न्यूड फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीला बेलाने अजिबात भीक घातली नाही. उलट तिने स्वतःच स्वतःचे न्यूड फोटो व्हायरल केले.

नेटकऱ्यांनी तिच्या या कृतीचं कौतुक केलं आहे. हॅकरची भीती न बाळगता त्याचा सामना करण्यासाठी नेटकऱ्यांनी तिच्या धाडसाबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे.