
नरेंद्र मोदी सरकार बुधवारी आपल्या दुसर्या कार्यकाळात मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे. मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी अनेक बड्या मंत्र्यांची सुट्टी करण्यात आली आहे. यावरूनच आता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, सांगता येत नाही, इतक्या मंत्र्यांनी राजीनामा का दिला? पत्रकारांशी बोलताना त्या अशा म्हणाल्या आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, ‘तुम्हाला वाटते का ते आपल्या कारभाराबाबत गंभीर आहेत? कोरोनासंदर्भात सर्व बैठकी पंतप्रधान करतात. आरोग्यमंत्र्यांची शिकार करण्यात आली आहे. जर पंतप्रधान गंभीर असते तर कोरोनाची दुसरी लाट आलीच नसती.’
दरम्यान, आज संध्याकाळी मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरीयल निशंक, सदानंद गौडा, देवोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतन लाल कटारिया आणि प्रताप सारंगी यांना राजीनामा द्यावा लागला आहे.





























































