उष्माघाताची बातमी देताना अँकरला भोवळ

दूरदर्शनच्या बांगला न्यूज अँकरचा उष्माघाताची बातमी देत असताना रक्तदाब वाढला आणि ती भोवळ येऊन जागेवरच बेशुद्ध पडली. या घटनेचा व्हिडीयो सर्वत्र प्रचंड व्हायरल झाला आहे. लोपमुद्रा सिन्हा असे या अँकरचे नाव असून घटनेनंतर सिन्हा यांनी आणखी एका व्हिडीओद्वारे फेसबुकवरून स्टुडिओत काय घडले त्याबद्दल सांगितले.