सलग सहाव्या दिवशी ‘बेस्ट’ ठप्प, संप चिघळण्याची चिन्हे

‘समान काम, समान वेतन’ तत्त्व राबवा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या, वेतनवाढ द्या अशा मागण्यांसाठी ‘बेस्ट’ कंत्राटी कामगारांनी सुरू केलेले आंदोलन आज सलग सहाव्या दिवशीही सुरू राहिल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने संप चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दादर येथे मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला.

कंत्राटी कामगारांच्या संपामुळे आज किकिध बस आगारात 798 बसेस बस आगारात उभ्या राहिल्याने आठकडय़ाच्या पहिल्या दिकशी प्रकाशांची कोंडी झाली. कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे ‘बेस्ट’ कंत्राटी कर्मचारी समन्कय समितीचे प्रतिनिधी किकास खरमाळे यांनी सांगितले. ‘बेस्ट’मध्ये वाहतूक सेवा पुरवण्यासाठी डागा ग्रुप, हंसा, मातेश्वरी, टाटा, ओलेक्ट्रा, स्किच मोबॅलिटी या कंपनीत चार वर्षांपूर्वी चालक म्हणून सेवेत रुजू होताना करारात 22 हजार 500 रुपये वेतन देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात 17 हजार रुपये पगार हातात मिळतो. साप्ताहिक सुट्टी केळेत मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची फसवणूक होत आहे. 30 दिवसांपैकी 26 दिवस कामावर हजर रहावे लागते. नादुरुस्त बसेस चालवाव्या लागतात, असे खरमाळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ‘बेस्ट’चे कर्मचारी गेल्या चार वर्षांपासून प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. दरम्यान, संप काळात प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीच्या 122 बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या. एसटी महामंडळाकडे 150 बसेसची मागणी केली होती.

 तर मेस्मालावणार

दरम्यान, कंत्राटी कामगारांशी चर्चा करून संपाकर तोडगा काढा, अशी सूचना बसेसचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना केली असून कंपनी किंवा कंत्राटी कामगारांवर ‘मेस्मा’ लावायचा यासाठी कायदेविषयक सल्ला घेत असल्याचे बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी सुनील वैद्य यांनी सांगितले.

 आझाद मैदानात आंदोलन

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी कामगार आझाद मैदानात धरणे आंदोलन करीत आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी आंदोलकांना भेटून प्रश्न समजून घेत असले तरी अद्याप त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.