फक्त 10 पैशांच्या शेअरने दिले छप्परफाड रिटर्न; एका लाखाचे झाले दोन कोटी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर मार्केटमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण सुरू असून बाजारात घसरण सुरुच आहे. बाजारातील या घसरणीमुळे अनेक गुंतवणुकदार कंगाल झाले आहेत. तसेच शॉर्ट टर्म रिटर्न देणाऱ्या मल्टीबॅगर शेअर्सनीही गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. मात्र, दीर्घ कालावधीसाठी गुतंवणूक केलेले काही शेअर्स चांगला परतावा देत आहेत. तसेच 10 पैशांच्या पेनी स्टॉकनेही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

सीके बिर्ला ग्रुप कंपनीच्या ओरिएंट पेपर अँड इंडस्ट्रीजच्या (Orient Paper And Industries) शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. हा पेनी शेअर काही वर्षापूर्वी फक्त 10 पैशांचा होता. आता तो 22 रुपयांवर आला आहे. या काळात हा शेअर 40 रुपयांपर्यंत पोहचला होता. त्याचा 52 विक हाय 39.40 रुपये आहे. तर तो सध्या 52 विक लोच्या आसपास आहे. त्याचा 52 विक लो 19.80 रुपये आहे. आगामी काळात हा शेअर भरघोस परतावा देऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार या शेअरने 20 हजार टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत. या कंपनीचा शेअर 19 सप्टेंबर 2003ला 10 पैशांवर होता. तर 23 जून 2022 रोजी हा शेअर 22.90 रुपयांवर होता. म्हणजेच 2003 मध्ये या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुतंवणूक केलेल्यांचे आता एका लाखाचे 2.30 कोटी रुपये झाले आहेत.

गेल्या 10 वर्षात या शेअरने चांगला परतावा दिला आहे. 2 ऑगस्ट 2003 मध्ये या एका शेअरची किंमत 1.01 रुपये होती. गेल्या 9 वर्षात या शेअरने 2000 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. या शेअरने 10 पैशांपासून 22 रुपयांपर्यंतचा प्रवास करत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.