
सामना प्रतिनिधी । मुंबई
पाच कि.मी. ‘बेस्ट’च्या प्रवासासाठी फक्त 5 रुपये तर एसी बसच्या प्रवासासाठी 6 रुपये तिकीट आकारण्याच्या ऐतिहासिक प्रस्तावाला आज पालिकेच्या महासभेत एकमताने मंजुरी मिळाली. शिवसेनेच्या पाठपुराव्यातून झालेल्या या महत्त्वाकांक्षी निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार असल्यामुळे रोडावलेली प्रवासीसंख्या वाढून बेस्टला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे.
भाडेकपातीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे बेस्टचे दोन किलोमीटरला 8 रुपये असलेले भाडे पाच किलोमीटरला 5 रुपये होणार आहे. शिवाय ‘बेस्ट’चा संपूर्ण कायापालट करणाऱया ऐतिहासिक प्रस्ताकामुळे बेस्टच्या ताफ्यात कातानुकूलित आणि इलेक्ट्रिक बसदेखील येणार आहेत. तसेच बेस्टला पालिकेकडून 600 कोटींचे अनुदानही मिळणार आहे. प्रादेशिक परिकहन प्राधिकरणाच्या अंतिम मान्यतेनंतर जुलैच्या पहिल्या आठकडय़ात 5 रुपये तिकीट लागू होणार आहे. आज महासभेत प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधकांसह सर्वपक्षीयांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सर्व गटनेते, नगरसेवक, महाव्यवस्थापकांचे आभार मानले. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, आशीष चेंबूरकर, राजुल पटेल, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, सपाचे रईस शेख, भाजपचे प्रभाकर शिंदे आदींनी प्रस्तावावर मत मांडले.
अशी असणार भाडेरचना
- पाच किमीसाठी 5 रुपये, एसीसाठी 6 रुपये
- 10 किमीसाठी 10 रुपये, एसीसाठी 13 रुपये
- 15 किमीसाठी 15 रुपये, एसीसाठी 19 रुपये
- 15 पेक्षा अधिक 20 रुपये, एसीसाठी 25 रुपये


























































