सलाड कधी खावे? जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…

9709

हल्ली अनेक जण सकाळी नाश्ता करताना आणि दुपारच्या जेवणात सलाड खाताना दिसतात. वजन कमी करण्यासाठी बऱ्याचदा तरुण आणि तरुणी सलाड खाताना दिसतात. मात्र ते योग्य पद्धतीने बनवले नाही, तर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात. तसेच सलाड बनविण्याची योग्य पध्दत जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचे वजन कमी होण्याऐवजी आणखी वाढू शकते. त्यामुळे सलाड योग्य पद्धतीने कसे बनवावे आणि त्यात काय-काय असायला हवे हे पाहूया…

सलाड हे नेहमी जेवणापूर्वी खायला हवे. परंतु जगभरातील जवळपास 90 टक्के लोक सलाड जेवताना घेतात. त्यामुळे सलाड खाण्याचा हवा तसा फायदा होत नाही. बऱ्याचदा यामुळे पचनसंस्थेवरही परिणाम होतो.

salad

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणापूर्वी जवळपास अर्धा तास आधी सलाड घेतल्यास याचा फायदा जास्त होतो. यामुळे सलाडमधील भाज्या, फळांचे पोषणद्रव्यांचा फायदा शरिराला पुरेपूर होतो.

salad-2

सलाद शक्यतो दोन पद्धतीने बनवले जाते. पहिली पद्धत आहे कच्च्या भाज्या-फळांचे सलाड आणि दुसरा प्रकार आहे उकडलेल्या भाज्या-फळांचे सलाड. पहिला प्रकार असो अथवा दुसरा तुम्ही यात वेगवेगळ्या भाज्या, फळांचा वापर करू शकता. यामध्ये वरतून मसाला टाकून खावू शकता. फक्त जेवणासोबत सलाड खाणे मात्र टाळा.

salad-5

जेवणासोबत सलाड का खावू नये यामागे शास्त्रीय कारणही आहे. बऱ्याचदा सलाडमध्ये वापरलेल्या भाज्या, फळं थंड प्रकृतिचे असतात. जेवण गरम असल्याने थंड सलाडचा फक्त शरिरावर नाही तर दातांवरही प्रभाव पडतो. कच्चे सलाड आणि शिजवलेले जेवण एकत्र घेतल्याने पचनसंस्थेवरही प्रभाव पडतो.

salad-4

सलाडमध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑईल घालू शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. तसेच दररोज एकाच प्रकारचं सलाड खाणे योग्य नाही. सलाडमध्ये प्रत्येक प्रकारच्या हिरव्या भाज्या महत्त्वाच्या आहेत. कधी ब्रोकोली, कधी पालक, कधी मेथी यांचा समावेश सलाडमध्ये करा. याशिवाय तुळस, रोझमेरीसारखे हर्ब्सही तुम्ही सलाडमध्ये वापरू शकता.

salad-6

सलाडमध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. कडधान्यांव्यतिरिक्त प्रोटिन मिळण्यासाठी पनीर, टोफूही वापरू शकता. यामुळे तुमचे सलाड प्रोटिनयुक्त आणि हेल्दी होईल. तसेच सलाड म्हणजे फक्त भाज्याच खाऊ नका, तर भाज्यांसोबत फळांचाही आहारात समावेश करा, कारण फळांमध्ये सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात.

salad-1

आपली प्रतिक्रिया द्या