
सामना प्रतिनिधी। भादा
औसा तालुक्यातील भादा परिसरावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे येथील २० हजार जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. कमी पावसामुळे सोयाबीन, तूर आणि ऊस या पिकांचे उत्पादन घटले. यामुळे पशूंना चारा कमी मिळेनासे झाले आहे.
या परिसरात पुरेसा पाऊसच न झाल्याने विहीरी ,नाले, तलाव कोरडे झाले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रब्बी हंगाम सुरू झाला तरी पेरणी झाली नाही यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
































































