
पंजाबमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे 2 हजार 300 गावे बुडाली. जवळपास 20 लाख लोकांना याचा फटका बसला. या अडचणीच्या काळात केंद्र सरकाकडून पंजाबला 1600 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर याउलट बिहार राज्याला 7,500 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अडचणीच्या काळात केंद्र सरकार पंजाब राज्यासोबत दुजाभाव करत आहे, असा गंभीर आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विशेष अधिवेशनात केला.
पंजाब राज्यातील नुकसानीचा प्राथमिक आकडा हा 13 हजार 800 कोटी रुपयांचा आहे. यापेक्षाही हा आकडा मोठा असू शकते. पंजाब राज्यावर सध्या मोठे संकट ओढावले आहे. संकटकाळात केंद्र सरकारने मदत करायला हवी. पंजाबमधील विरोधी पक्षातील नेत्यांनीही राजकारण न करता पंजाबमधील लोकांना मदत करण्यासाठी एकजुटता दाखवावी. ज्यावेळी राज्य सरकार पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करत होते. त्यावेळी विरोधी पक्षातील नेते पह्टो काढण्यात व्यस्त होते अशी टीका मान यांनी केली.