मी बॉलिवूड सोडल्याने चाहते पतीला द्यायचे शिव्या, अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री हिने यशाच्या शिखरावर असताना अचानक बॉलिवूडला रामराम ठोकायचा निर्णय घेतला. तिने लग्नानंतर चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घधेतला होता. तिच्या या निर्णयाने चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला होता. त्याकाळी सोशल मीडियावरील ट्रोलिंग हा प्रकार नव्हता मात्र तरी देखील भाग्यश्रीच्या या निर्णयासाठी तिच्या पतीला जबाबदार धरत चाहत्यांनी त्याला शिव्या घातल्या होत्या, भाग्यश्रीने एका मुलाखतीत याबाबत सांगितले आहे.

bhagyashree1

‘लोकांना आयुष्यात हवे असते ते सर्व स्टारडम मला मिळाले. पण मी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. मला लग्न करायचे होते. मात्र चाहत्यांनी त्या साठी माझ्या पतीला जबाबदार धरले. तो बिचारा मला बॉलिवूडपासून लांब केले म्हणून चाहते त्याला शिव्या शाप देत होते. कदाचित त्यावेळी मी एकटीच असेन जी त्याच्यावर प्रेम करायचे. आम्ही दोघंही तेव्हा तरुण होतो, एकमेकांच्या प्रेमात पडलेलो. त्यामुळे आपल्या बायकोकड़े कुणी पाहू नये, ती आकर्षणाचा बिंदू ठरू नये असे त्याला वाटत होते पण ते मी समजू शकते’, असे भाग्यश्रीने एका मुलाखतीत सांगितले आहे.

मैने प्यार किया चित्रपटात सलमान खान सोबत भाग्यश्री झळकली होती. या चित्रपटाने प्रसिद्धीचे सर्व रेकॉर्ड त्यावेळी तो़डले होते. भाग्यश्रीला चित्रपटाच्या अनेक ऑफर्स येत होत्या. मात्र त्या ऑफर्सला नकार देत भाग्यश्रीने संसार करायचा निर्णय घेतला होता.

काही वर्षापूर्वी भाग्यश्रीने मालिकांमधून छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. ती लौट आओ त्रिशा या मालिकेत दिसली होती. लवकरच आता ती प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या राधे श्याम व कंगना रनौतच्या थल्लायवी या चित्रपटात दिसणार आहे. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दस्सानी याने देखील चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून तो ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटात दिसला होता.