Video – आंदोलनादरम्यान गाडी कोसळली, काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप गाडीवरून पडले

मुंबईमध्ये काँग्रेसने इंधनदरवाढीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनासाठी बैलगाडी आणण्यात आली होती. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे कार्यकर्त्यांसह या गाडीवर उभे होते. या गाडीवर उभ्या असलेल्या काही कार्यकर्त्यांनी हातामध्ये सिलिंडर धरले होते. फोटोग्राफरनी भाई जगताप यांना पोझसाठी विनंती केली असता त्यांनी हालचाल केली आणि त्याचवेळी गाडी कोसळली. यामुळे गाडीवर उभे असलेले भाई जगताप हे कार्यकर्त्यांसह पडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या