
वैनगंगा नदीला आलेल्या पूरामुळे माडगी येथील नरसिंह मंदिरात अडकलेल्या 15 भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तब्बल 19 तासानंतर या भाविकांची सुटका करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील माडगी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात असलेले नरसिह मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त भाविकांची गर्दी झाली होती. मात्र मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीला पूर आला. त्यामुळे 15 भाविक मंदिरात अडकून पडले होते. या भाविकांमध्ये 7 स्त्रिया तर 8 पुरुषांचा समावेश होता. त्यानंतर राज्य आपत्ती निवारण दलाने या ठिकाणी बचाव कार्य सुरू केले होते. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक जास्त असल्याने त्यांच्या सुटकेत अडथळे येत होते. अखेर तब्बल 19 तासानंतर आज सकाळी त्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

























































